मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चंदिगड , गुरूवार, 30 एप्रिल 2015 (11:15 IST)

पंजाब : आई-मुलीला बसबाहेर फेकल्याने मुलीचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील मोगा जिल्ह्यात बुधवारी रात्री, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्याकडून चालविण्यात येत असलेल्या बसमधील कर्मचाऱ्यांनी एका आई व मुलीची छेडछाड काढून त्यांना बसबाहेर फेकल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
बादल यांच्या ऑर्बिट कंपनीच्या बसमधून आईसह 13 ते 14 वर्षाची मुलगी व एक मुलगा प्रवास करत होते. सुरवातीला बसमधील काही प्रवाशांनी मायलेकीची छेडछाड केली. याला मायलेकींनी विरोध केल्यानंतर प्रवाशांनी त्यांना मारहाण केली. यानंतर चालक व वाहकाने प्रवाशांची बाजू घेतली. या घटनेनंतर महिलेने बस थांबविण्यास सांगितले. पण, वाहकाने बस न थांबविता महिलेला आपल्या मुलांसह चालत्या बसमधून ढकलून दिले. यामध्ये 14 वर्षाची अश्मीत कौरचा मृत्यू झाला तर, तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे चालक व वाहक फरार आहेत.