मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (16:44 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'जसा देश तसा भेस'!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जपानी भाषेतून 'ट्विट'करून जपानी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोदींनी जपानी भाषेतून नावीन्यपूर्ण कल्पनांबद्दल जपानी नागरिकांची प्रशंसा केली आहे.अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशी भाषेमधून तेथील नागरिकांशी संवाद साधणारे मोदी भारतातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदी यांनी आपल्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून आणि पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून जपानी भाषेतून ट्विट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
येत्या 30 ऑगस्टपासून मोदी जपानच्या दौर्‍यावर जात आहेत. मोदी हे टोकियो आणि क्योटो या दोन शहरांना भेट देणार असून, तेथील विविध क्षेत्रांतील लोकांशी संवाद साधणार आहेत.
 
भारत आणि जपानमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशिल राहाणार असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्‍ट केले आहे.