गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: टोकियो , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (17:41 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची सेंच्युरी!

गेल्या अडीच वर्षांत जे झाले नाही, ते आपल्या सरकारने अवघ्या शंभर दिवसांत करून दाखवले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. मोदी सध्या जपान दौर्‍यावर आहेत. जपानमध्ये उद्योजकांशी संबोधित करताना मोदी यांनी आपल्या सरकारच्या यशस्वी वाटचालीची माहिती सांगितले.

मोदी म्हणाले, भारतात गुंतवणूक करू इच्छित असणार्‍यांना भविष्यात लालफितीचा सामना करावा लागणार नाही, तर त्यांचे लाल गालिचा अंथरून स्वागत केले जाईल. मोदींनी आपल्या हिंदीतील भाषणात जपानमधील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. भारतात गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांना सोयीचे व्हावे, यासाठी आपल्या सरकारने अनेक अटी रद्द केल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारतात विकासाचे नवनवीन प्रकल्प सुरू व्हावेत आणि उत्पादनाला चालना मिळावी, यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे. सध्यातरी गुंतवणूक करण्यासाठी भारताशिवाय दुसरा चांगला देश नाही. भारत हा एकमेव देश आहे जिथे डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड या तिन्ही गोष्टी सापडतात, असे जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन'ने आयोजित केलेल्या परिषदेत मोदी यांनी सांग‍ितले.