मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 3 सप्टेंबर 2014 (10:38 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच प्रोत्साहन मिळते- प्रकाश जावडेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांकडून त्यांच्या बाबत खोटी माहिती पसरवली जात असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांनी मंगळवारी सांगितले. मोदीसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळत आहे. विशेष म्हणजे मोदी यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र आहे. मोदींमुळे प्रोत्साहन मिळते. अशा शब्दात जावडेकर यांनी भाजप सरकारला सत्तेत येऊन 100 दिवस झाल्याबद्दल मोदींची प्रशंसा केली.
 
जावडेकर म्हणाले, देशातील जनतेने मोदी सरकारला पाच वर्षांसाठी सत्ता दिली आहे. अजून 100 दिवस पूर्ण झशले आहे. मोदींच्या नेतृत्त्वात कामाला गती मिळाली आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्या शंभर दिवसांत पेट्रोलच्या दरात दोन वेळा कपात करण्‍यात आली. टप्प्या टप्प्यांने सगळ्यात गोष्टींचे दर आवाक्यात आणले जाणार आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी देशाच्या हिताचे निर्णय घेतले आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील नेत्यांना आपली निर्णय क्षमता आणि नेतृत्त्वगुणांमुळे प्रोत्साहीत केले असल्याचे जावडेकरांनी प्रसारमाध्यमाशी संबोधित करताना सांग‍ितले.