शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2015 (12:56 IST)

पंतप्रधानांचा देशबांधवांना संदेश

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 
गेल्या वर्षी आजच्याच दिवशी जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने मला पंतप्रधान पदाची जबाबदारी मिळाली. मी स्वत:ला 'प्रधनासेवक' मानून याच भावनेतून ही जबाबदारी पार पाडत आहे. 
 
अंत्योदय आमच्या राजकीय तत्वज्ञानाचा मूलमंत्र आहे. प्रमुख निर्णय घेतेवेली नेहमी माझ्या डोळ्यासमोर वंचित, गरीब, मजुर आणि शेतकरी असतात. जनधन योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते आणि प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना तसेच अटल पेन्शन योजा याचेच उदाहरण आहे. 
 
'अन्नदाता सुखी भव:' याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आपले शेतकरी अथक परिश्रम करून देशाला अन्न सुरक्षा प्रदान करतात. 'प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना', 'मृदा आरोग्य कार्ड' वीजेची उपलब्धता, 'नविन युरिया धोरण' ही कृषी विकासासाठी आमचे कटिबद्धता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांबरोबर आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. नुकसान भरपाईची रक्कम दीड पटीने वाढवली आणि पात्रता निकष शेतकर्‍यांच्या हिताचे केले. 
 
भ्रष्टाचार-मुक्त, पारदर्शक, धोरण आधारित प्रशासन आणि त्वरित निर्णय हे आमचे मूलभूत सिद्धांत आहेत. यापूर्वी कोळशासारखी नैसर्गिक संपत्ती किंवा स्पेक्ट्रमचे वाटप मनमानी पद्धतीने आपल्या आवडत्या उद्योगपतींना केले जायचे. परंतु देशातली साधनसंपत्ती ही देशाची संपत्ती आहे. सरकारचा प्रमुख या नात्याने मी त्याचा ट्रस्टी आहे. म्हणूनच आम्ही निर्णय गेतला की याचे वाटक लिलाव पद्धतीने व्हावे. कोळशाच्या वाटपातून आतापर्यंत अंदाजे तीन लाख कोटी रुपये तर स्पेक्ट्रमच्या वाटपातून अंदाजे क लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. 
 
सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी विश्वासार्ह सरकार गरजेचे असते. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा आर्थिक स्थिती डळमळीत होती. महागाई वेगाने वाढत होती, मला आनंद होत आहे की आमच्या प्रयत्नांमुळे गेल्या वर्षभरात भारत जगातील वेगवान विकास दर असलेली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला, महागाई नियंत्रणात आली आणि वातावरणात नवीन उत्साह संचारला. 
 
जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भांडवली गुंतवणुक वाढली आहे. 'मेक इन इंडिया' आणि 'स्किल इंडिया' अभियानाचा उद्देश आपल्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. आम्ही मृदा बँक स्थापन केली ज्यामुळे लघु उद्योग करणार्‍या बंधु-भगिनींना 10 हजार रुपयापासून दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज सुलभपणे मिळू शकेल. आम्ही काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. सरकार बनल्यानंतर पहिला निर्णय हा काळ्या पैशाबाबत विशेष तपास संस्था स्थापन करण्याचा घेतला. त्यानंतर आम्ही परदेशात काळा पैसा पडवून ठेवणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदा बनवला. 
 
सुना-मुलींना उघड्यावर शौचासाठी जावे लागू नये, शौचालयाअभावी मुलींनी शाळा सोडू नये आणि घाणीमुळे निरागस मुले वारंवार आजारी पडू नयेत हा 'स्वच्छ भारत अभियाना'मागील विचार आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. म्हणूनच आम्ही 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियान सुरू केले. शतकांपासून आपल्या जिव्हाळ्याचा विषय असलेली माता गंगा प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आम्ही 'नमामिगंगे' कार्यक्रम सुरू केला. गावाने रुप पालटावे आणि पक्के घर, चोवीस तास वीज, पिण्यासाठी पाणी, शौचालय, रस्ते आणि इंटरनेट यासारख्या मुलभूत सुविधा प्रत्येक कुटुंबाला मिळून त्यांचे जीवनमान सुधारावे हा आमचा हेतु आहे. हे सर्व यशस्वीपणे पार पडावे यासाठी तुमची भागीदारी आवश्यक आहे. 
 
आम्ही जोडण्याचे काम केले आहे. देशाच्या सीमा, बंदरे आणि संपूर्ण भारताला एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जोडण्यासाठी रस्ते आणि रेल्वेला पुनर्जन्म देण्याचा प्रयत्न केला. लोकांना जोडण्यासाठी 'डिजिटल इंडिया' तसेच सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर 'टीम इंडिया' ची भावना हा दरी मिटविण्याचा एक प्रयत्न आहे. 
 
पहिल्या वर्षी विकास दर वाढीमुळे देशाने गमावलेला विश्वास पुन्हा एकदा मिळवला आहे. मला खात्री आहेकी आमच्या प्रयत्नांनी तुमच्या जीवनाल स्पर्श केला असेल, ही मात्र सुरुवात आहे. देश पुढे जाण्यासाठी सज्न आहे. चला, आपण संकल्प करूया की आपले प्रत्येक पाऊल देशहितासाठी पुढे पडले. 
 
तुमच्या सेवेत समर्पित 
जय हिंद 
नरेंद्र मोदी