शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पती कुत्रा सोडून आला, तर महिलेने स्वत:ला आग लावली

परमातिवेलुर (तमिळनाडू)- पतीने कुत्र्याचं पिल्लू निर्जन जागेवर जाऊन सोडून दिले तर आपल्या कुत्र्यावर जीव असलेल्या पत्नीने स्वत:ला पेटवून घेतले. ती कुत्र्याशी दुरी सहन करू शकली नाही आणि स्वत:ला आग लावून घेतली.
पोलिसांप्रमाणे शांती 85 टक्के जळाली असून नामक्कल जिल्ह्यातील एका स्थानीय रूग्णालयात मृत्यूला झुंज देत आहे. परमातिवेलुर येथील पोलिस निरीक्षक यांनी सांगितले की महिलेचे कुत्र्यावर खूप प्रेम होतं आणि तिच्या पतीने त्याला एका निर्जन स्थळावर जाऊन सोडून दिले. ती हे दुःख सहन करू शकली नाही आणि तिने स्वत:ला पेटवून घेतलं.
 
कुत्र्याने पिल्लूला जन्म दिल्यापासूनच पती परेशान होता. त्याने आधी कुत्र्याला मग पिल्लूला सोडून दिले. महिला स्वत: दोन मुलांची आई आहे. सध्या याबाबत कोणतेही प्रकरण दाखल केले नाही.