गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जम्मू , सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (11:22 IST)

पाकिस्तानकडून सीमेवर तोफांचा मारा

नापाक पाकिस्तानकडून  शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच असून पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय सीमा चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला.

पाकिस्तानी रेंजर्सनी शनिवारी रात्री आरएसपुरा भागातील भारतीय सीमा चौक्यांवर दोन तोफगोळे डागले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकच्या या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवहानी झाली नाही. शुक्रवारी पाकिस्तानी रेंजर्सनी अखनूर सेक्टरमधील भारतीय सीमा चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळे डागले होते.