गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पाकिस्तानातील शाळेत मुलांना पाठवू नका

नवी दिल्ली- काश्मीर हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने वेळोवेळी घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे दिवसेंदिवस भारत-पाकचे संबंध ताणले जात असून, याचा परिणाम म्हणून भारताने पाकिस्तानातील भारतीय मुत्सद्दय़ांच्या मुलांबाबत ‘नो स्कूल गोइंग मिशन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात असलेल्या भारतीय मुत्सद्दय़ांनी पाकिस्तानातील शाळांमधून आपल्या मुलांची नावे कमी करून त्यांना भारतात परत पाठवावे अशी सूचना भारतीय उच्चयोगाने पाकिस्तानातील मुत्सद्दय़ांना केली आहे.
 
टीव्हीवर प्रसारित करण्यात आलेल्या याबाबतच्या वृत्तानुसार केंद्र सरकारच्या या निर्णयाचा पाकिस्तानातील शाळांमध्ये शिकत असलेल्या 50 हून अधिक विद्यार्थ्यांवर थेट परिणाम होणार आहे.
 
काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताला मोठी काळजी लागली असून विद्यार्थ्यांना भारतात परत बोलावण्याबरोबर भारत डिप्लोमॅटिक मिशनवर पाकिस्तानात गेलेल्या  कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.
 
 
भारताने हा निर्णय दोन महिन्यापूर्वीच कळविला होता. कोणतेही कारण भारताने दिलेले नसून या निर्णयाचे वेगळे अर्थ काढू नयेत, असे पाकिस्तानच परराष्ट्र मंत्रालाचे प्रवक्ते नफिस झकारीया यांनी सांगितले.