शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गांधीनगर , सोमवार, 18 एप्रिल 2016 (16:16 IST)

पाटीदार समाजाच्या आंदोलनास हिंसक वळण

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यासह अनेक भागांत पाटीदार समाजाच्या लोकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करून निदर्शने केली. निदर्शकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जमाव बंदी लागू करण्यात आली आहे.
कोणतेही ठोस आश्‍वासन सरकारने न दिल्याने संतप्त झालेल्या पाटीदारांनी निदर्शने केली व सोमवारी गुजरात बंदचे आवाहन केले. तसेच अटक केलेल्या आंदोलकांना सोडण्याची मागणी केली. निदर्शकांनी हार्दिक याच्या समर्थनार्थ जेल भरो आंदोलन सुरू केले. निदर्शकांवर पोलिसांनी लाठीमारही केला. 435 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आंदोलकांनी सोमवारी (दि.18) गुजरात बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, आंदोलनाची व्याप्ती वाढू नये, अफवा पसरू नये, यासाठी पुढील 24 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांची गाडीचीही तोडफोड करून त्याला आग लावली. अहमदाबाद आणि राजकोटमध्ये 12 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे.