बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (18:52 IST)

पाळण्यासाठी आता २६ आठवड्यांची रजा

बाळंतपणाची नोकरदार महिलांना १२ ऐवजी २६ आठवड्यांची रजा देण्याचा प्रस्ताव असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मॅटर्निटी बेनिफिट अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेल्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाने ही त्रिपक्षीय बैठक आयोजित केली होती. या कायद्यानुसार सध्या नोकरदार महिलांना प्रसूतीच्या अपेक्षित तारखेच्या आधी सहा आठवडे व प्रसूतीनंतर सहा आठवडे भरपगारी बाळंतपणाची रजा देण्याची तरतूद आहे. ही रजा वाढवून २६ आठवडे करण्याचे दुरुस्ती विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे.