शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 21 मार्च 2016 (12:09 IST)

प्रत्येक पीडित व्यक्तींचा आवाज होते बाबासाहेब आंबेडकर (मोदी लाइव्ह)

- बाबासाहेबांच स्वप्न पुर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- दलित, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांचा आरक्षण अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी. 

- वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा काही लोक आता आरक्षण जाईल असं बोलायला लागले, मात्र असं काहीच झालं नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- दलित, आदिवसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागलेला नाही, मात्र जिथे आमची सत्ता आहे तिथे अजूनही खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- काही लोकांना आम्ही अजिबात आवडत नाही, आम्हाला पाहायला पण आवडत नाही, त्यांना आजार होतो, आणि आजारात माणूस काहीही बोलतो, मनावरचा ताबा सुटतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- बाबासाहेब जर सरकारमध्ये राहिले असते तर मी जे आज करतो आहे ते त्यांनी 60 वर्षापुर्वीच केलं असतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- जेव्हा महिलांच्या हक्कांचा विषय आला तेव्हा जर महिलांना समान हक्क मिळणार नसतील तर मी मंत्रिमंडळाचा भाग राहू शकत नाही याबाबत बाबासाहेबांच मत स्पष्ट होते - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- बाबासाहेबांनी मंत्रीमंडळातून राजीनामा का दिला ? हे फार कमी लोकांना माहित आहे, इतिहासातला हा भाग विसरले आहोत किंवा बदलला गेला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- ज्याप्रकारे सरदार पटेल यांनी राजकीय एकीकरणासाठी काम केलं त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सामाजिक एकीकरणासाठी काम केलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक अमानुष घटनेविरोधात आवाज उठवणारे महापुरुष होते - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार बनवत त्यांच्यावर अन्याय करत आहोत, बाबासाहेबांना कोणापुरतं मर्यादित ठेवू नये - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- बाबासाहेब आपल्याला 1956मध्ये सोडून गेले, आज 60 वर्षानंतर आपण स्मारक बांधायला सुरुवात करत आहोत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.