शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: बंगळुरू , बुधवार, 30 जुलै 2014 (14:54 IST)

बंगळुरूमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शांती धामा शाळेत एका ७ वर्षीय मुलीवर शाळेतील शिपायाच्या मुलानेच अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बंगळुरूतील विबग्योर हायस्कूलमध्ये २ जुलै रोजी एका सहा वर्षाच्या मुलीवर अज्ञात लोकांनी बलात्कार केला होता; परंतु १५ जुलै रोजी हे प्रकरण उघडकीस आले होते.

याप्रकरणी पोलिसांनी काल दोघांना अटक केली होती. या घटनेमुळे कर्नाटकसह देशभरातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच बलात्काराची दुसरी घटना समोर आली आहे.