शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (12:47 IST)

बराक ओबामा घेणार ‘वारी’चा अनुभव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या वारीचे दर्शन घेणार आहेत. हे ऐकल्यावर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण हे शक्य होणार आहे, येत्या 26 जानेवारी रोजी.. तुम्ही म्हणाल कसं.. तर ऐका कसं.. बराक ओबामा हे प्रत्यक्ष वारीच्या सोहळ्यात सामील होणार नाहीत. पण येत्या 26 जानेवारी रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा यांना निमंत्रित केले आहे. या सोहळ्याला हजर राहण्यास ओबामांनी होकार दिला आहे. या सोहळ्यात विविध राज्यांचे चित्ररथ सामील होणार आहेत. यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ हा शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या वारीवर आधारित आहे. या चित्ररथाच्या रुपाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना वारीचे दर्शन होणार आहे.