शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 डिसेंबर 2014 (15:41 IST)

बापरे... वड्रांच्या ‘त्या’फाईल्स गायब?

दिल्ली :  डीएलएफ आणि रॉबर्ट वड्रा यांच्यातील वादग्रस्त जमीन व्यवहारासंबंधीच्या दस्तऐवज असलेल्या फाईल्स गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.  याबाबत चौकशी करण्याचे आदेश हरियाणा सरकारने दिले आहेत.

‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’या वड्रा यांच्या फर्मला त्रिसदस्यीय आयोगाने क्लीन चिट देतानाच तत्कालीन आयएएस अधिकारी अशोक खेमका यांचा नामांतरणरद्द करण्याचा आदेश अयोग्य ठरविला होता. हा आयोग स्थापण्यासंबंधी हरियाणा सरकारचे टिपणही मुख्य फाईलमधून गहाळ आहे.

कृष्ण मोहन, के. के. जलान आणि राजन गुप्ता या तिघांचा चौकशी आयोग स्थापन करण्याचा आदेश मुख्य सचिवांनी १९ आॅक्टोबर २०१२ रोजी दिला होता. या संबंधित आदेशाची प्रत मुख्य फाईलमधून गहाळ असून तिचा शोध लागलेला नाही, असे अधीक्षक डॉ. वधवा यांनी राज्य माहिती आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.