गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Updated :मुंबई , सोमवार, 28 जुलै 2014 (16:52 IST)

बेळगावप्रश्नी मोदी सरकार गप्प का? राज ठाकरेंचा सवाल

बेळगावामधील येळ्ळूरमधील महाराष्‍ट्र राज्याचा बोर्ड हटवल्याच्या प्रकरणात आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. कन्नडिगांनी केलेल्या अमानुष मारहाणीबाबत राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार बेळगावप्रश्नी गप्प का? असा सवाल राज ठाकरे केला आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नी गंभीर नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

येळ्ळूरमधील मराठी भाषिकांवर कर्नाटकी पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राज ठाकरे यांनी निषेध केला. राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्य सरकार सीमाप्रश्नी गंभीर नाही. कर्नाटकी पोलिसांनी मराठी भाषिकांना घरात घुसून बेदम मारहाण केली. मात्र, कर्नाटकी पोलिसांवर कारवाई का झाली नाही, असे प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.