गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्‍ली , शुक्रवार, 25 जुलै 2014 (16:21 IST)

ब्लॅकमनी भारतात परत आणणे अशक्य-खासदार दुबे

ब्लॅक मनी अर्थात काळा पैसा भारतात परत आणण्‍यासाठी सत्ताधारी मोदी सरकार प्रयत्न करता असताना दुसरीकडे भाजपच्या एका खासदारांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. स्विस बँकेतून काळा पैसा परत आणणे अशक्य असल्याचे वक्तव्य झारखंडच्या गोड्डामधून निवडून आलेले भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत केले आहे. ' विशेष म्हणजे त्यांनी जेव्हा हे वक्तव्य केले तेव्हा अर्थमंत्री अरुण जेटली हे सभागृहात उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचारात काळा पैसा भारतात परत आणण्याचे जनतेला आश्वासन दिले होते. मोदी सरकारने सत्तेवर येताच काळा पैसा परत आणण्यासाठी एसआयटीही स्थापन केली होती. अरुण जेटलींनीही स्विस सरकारला पत्र लिहून काळापैसा जमा असलेल्या पैशाचे तपशीलही मागवले होते. स्विस सरकारनेही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता.