गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

भारत-चीन सीमावाद सोडविणे गरजेचे

गेल्‍या काही दिवसांपासून भारत-चीन सीमे संदर्भातील वादानंतर उपस्थित झालेल्‍या मुद्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर दोन्‍ही देशांसंदर्भातील वाद अधिक गंभीरतेने सोडविण्‍याबाबतची आवश्‍यकता वाढली असल्‍याचे मत भारताने व्‍यक्त केले आहे. अरुणाचल प्रदेशावरील हक्का संदर्भात दोन्‍ही देशांमध्‍ये गेल्‍या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.

भारतीय परराष्‍ट्र सचिव निरूपमा राव यांनी या संदर्भात मत व्‍यक्त करताना सांगितले, की भारत आणि चीन दरम्‍यान सीमा मुद्दा जगातील सर्वाधिक गुंतागुंतीच्‍या सीमा मुद्यांप्रमाणे असून दोन्‍ही देश तो सोडविण्‍यासाठी प्रयत्नशील आहेत.