शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2016 (14:55 IST)

भारतात 'मन की बात' करणं कठीण: करण जोहर

अभिनेता आमीर खाननंतर आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहर वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून करण म्हणाला की भारतात मन की बात करणं कठीण आहे. तो म्हणाला की भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही हे दोन मोठे जोक आहे. असा खळबळजनक विधान करणने लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान लेखिका शोभा डेला मुलाखतीत केला.
 
करण जोहर म्हणाला की मन बात करण्यासाठी किंवा मनातील काही सांगण्यासाठी भारत हे योग्य स्थान नाही. असे केल्यावर एखादी कायदेशीर नोटीस कायम माझा पिच्छा पुरवत असते असे मला वाटते. इथे तुमच्या विरोधात कधी कुठे गुन्हा दाखल होईल, हे सांगता येत नाही. 
 
'14 वर्षांपूर्वी माझ्यावर राष्ट्रगीताच्या अवमानाची केस झाली होती, त्यासही मी सामोरं गेलोय.  तुम्ही तुमचे स्वतःचे मत मांडणे आणि लोकशाहीबद्दल बोलणे, या दोन्ही गोष्टी मोठी थट्टा आहे. आम्ही फ्रीडम ऑफ स्पीचच्या गप्पा करतो, पण जर तुम्ही सेलेब्रिटी असाल आणि तुम्ही तुमचे काही मत मांडले तर, वाद निर्माण होतो.
 
करणने म्हटले की पुरस्कार परत करणे किंवा नाकारणे योग्य नाही.