शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (13:44 IST)

भारताने केले सर्जिकल स्ट्राईक

भारता विरुद्ध कारस्थान करत नेहमी सीमारेषापार भारतावर नेहमीच हल्ला करतो तर अनेक गावांवर तो दारू गोळा टाकतो.त्यात खर म्हणजे उरी येथील हल्ला होय त्यामुळे भारताच्या रागाला पाकिस्थानला सामोरे जावे लागणार आहे. तर   नेहमी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. आपला भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये  सर्जिकल स्ट्राईक्स करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.

युद्धशास्त्रातील सर्जिकल स्ट्राईक ही  एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये  निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याच प्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारण आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक होय म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. आपण म्हणतो ना त्याला त्या ठिकाणी घुसून मारला तसा हा प्रकार आहे.भारताने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत सर्जिकल स्ट्राईक केले. यामध्ये सैन्याच नुकसान होणार नाही या कडे लक्ष देऊन शत्रू वर असा हल्ला होतो की त्याला प्रतिउत्तर देताच येत नाही.