गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: मुरैना , शनिवार, 26 जुलै 2014 (16:13 IST)

मध्य प्रदेशात एका अॅसिड हल्लेखोराला फाशी

मध्य प्रदेशतील एका कोर्टाने विवाहित प्रेयसीवर अॅसिड हल्ला करून तिची हत्या करणार्‍या एका तरुणाला फाशीची शिक्षा सुनावली आहे.मुरैना जिल्ह्यातील अंबाह येथील कोर्टने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायाधीश पी.सी.गुप्ता यांनी, योगेंद्रसिंग तोमर या पोरसा येथील तरुणाला, रुबी गुप्ता या तरुणीवर अॅसिड फेकून तिला ठार केल्याबद्दल दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. 
 
आरोपीला या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा पुरेशी नसल्याने त्याला मृत्युदंड दिला जात आहे, असे निकालात नमूद केले आहे. अॅसिड हल्ल्याच्या गुन्ह्यातील दोषीला पहिल्यांदा फाशीची झालेली शिक्षा सुणावल्या हे देशातले पहिलेच उदाहरण आहे. 
 
रुबी गुप्ता ही माहेरी आली होती. ती आपल्या खोलीत एकटी झोपली असताना योगेंद्रने घरात शिरून तिच्यावर अॅसिड फेकले होते. तिच्या किंकाळ्या ऐकून घरातील मंडळी धावली तेव्हा योगेंद्रने त्यांच्याही अंगावर अॅसिड फेकले. या अॅसिड हल्ल्यात चंद्रकला, जोनू व राजू हे तिघेही जखमी झाले होते. उपचारादरम्यान रुबीचे निधन झाले होते.