शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: बारवाह (मध्य प्रदेश) , शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (10:50 IST)

मध्यप्रदेशात मुलीवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील पिपालजोहा जंगलात एका 18 वर्षाच्या मुलीवर एका भाजपा नेत्याच्या मुलासह सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. 
 
ही घटना गुरुवारी भागवानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. भाजपाचे माजी आमदार दलसिंग सोलंकी यांचा मुलगा नांगुडा ऊर्फ संतोष, अक्का, नानू, थाविरीया, बिला आणि कालरिया ही अटकेतील आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी बाडय़ा या गावची आहे. पीडित मुलाला एक्काने लग्नाचे आमिष दाखवून जंगलात बोलावले आणि त्यानंतर आपल्या पाच सहकार्यासह बलात्कार केला.