शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (17:07 IST)

महागात पडली डीएमसोबत सेल्फी, ताब्यात

बुलंदशहर- उत्तर प्रदेशातील बुलंदशहराच्या एका तरूणाला महिला डीएमसोबत ‘सेल्फी‘ घेणं महागात पडलं. पोलिसाने त्याला ताब्यात घेतले आहे.
 
बुलंदशहराच्या डीएम बी. चंद्रकला आपल्या कार्यालयात कमलापुर गावाच्या लोकांची तक्रारांची सुनावणी करत होत्या. त्यादरम्यान गावाच्या प्रधानसोबत आलेला 18 वर्षाचा तरूण फरद अहमद मोबाइलने त्यांचे फोटो काढू लागला. काही वेळाने तो परवानगी घेतल्याविना त्यांच्यासोबत सेल्फी काढू लागला. चंद्रकला यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलंदशहराच्या जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांची कार्यालयामध्ये सुनावणी सुरू होती. त्या बोलत असताना फरद अहमद (वय 18) हा त्यांच्यासमोर येऊन ‘सेल्फी‘ घेऊ लागला. एक नव्हे तर त्याने अनेक छायाचित्रे काढली. चंद्रकला यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. 
 
डीएम म्हणाल्या, सेल्फी काढल्यामुळे नाही तर मोबाइलमधून त्याने काढलेली फोटो डिलीट करायला सांगितल्यानंतर त्याने गोंधळ घातल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. अहमद याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे असे पोलिसांनी सांगितले.