शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 3 ऑक्टोबर 2007 (11:55 IST)

महात्मा गांधी हे 'सुनीता'चे आदर्श

"जगातील असामान्य व्य‍क्तीमत्व असणारे महात्मा गांधी हे माझे आदर्श आहेत, असे मत भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने मंगळवारी व्यक्त केले.

काल सुनिताने एका शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज केली. त्यावेळी सुनिता बोलत होती. "अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे महात्मा गांधी हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे "अहिंसा' व्रत जगातील सर्व सत्तरातील लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे आहे, त्यामुळेच गांधीजी माझे आदर्श आहेत. मी जरी परदेशी नागरिक असले, तरी देखील माझे वडील भारतीय असल्याने मी भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, असे मत सुनिताने व्यक्त केले. या भावनेतून सुनिताचा भारताबद्दलचा व गांधीजींप्रती असणारा आदर दिसून आला.