शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 29 जुलै 2014 (17:37 IST)

महेसाणामध्ये मशिदीची भिंत कोसळून दोन ठार

महेसाणा- महेसाणा येथील ईदगाह मशिदीची भिंत कोसळून दोन ठार झाले आहेत. या दुर्घटनेत 35 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी पावने नऊ वाजता घडली. यामुळे रमजान ईदच्या उत्सवावर विरजन पडले आहे.

आज रमजान ईद आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मशिदीत उपस्थित होते. नमाज अदा केल्यानंतर ते एकमेकांना शुभेच्छा देत असताना अचानक मशिदीची भ‍िंत कोसळली. त्याखाली 35 पेक्षा जास्त जण दाबले गेले. त्यापैकी दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले होते. त्यानंतर 33 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.