शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 30 जुलै 2016 (17:35 IST)

मायावतींनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही : आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास  आठवलेंनी थेट बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावरच हल्ला चढवला आहे. “मायावती या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करतात, मात्र त्यांची तत्वं, आदर्श पाळत नाही”, असं निशाणा आठवलेंनी साधला.

रामदास आठवलेंनी मायावतींना अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला आहे. मायावतींनी अद्याप बौद्ध धर्म का स्वीकारला नाही? असं विचारत मायावती हिंदू आहेत, त्यांना दलितांशी घेणं-देणं नाही, असा आरोप आठवलेंनी केला.