शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 28 जानेवारी 2015 (10:33 IST)

मी 'भारतरत्न'च्या योग्यतेचा नाही?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीवर विनम्रतेने असहमती दर्शविली आहे. आपण भारतरत्न मिळण्याच्या योग्यतेचे नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे.
 
अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषणऐवजी भारतरत्न जाहीर केला पाहिजे होता, या आशयाचे ट्विट ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अमिताभ म्हणाले, या पुरस्कारासाठी मी स्वत:ला त्या योग्यतेचा समजत नाही. देशाने जे दिले आहे त्याने मी खूपच सन्मानित झालो आहे, असे  ट्विट केले आहे.