मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 24 जानेवारी 2015 (11:20 IST)

मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या

सुरक्षित आश्रयस्थाने कदापि सहन केली जाणार नाहीत, असे सुनावत ओबामा यांनी मुंबईवरील हल्ल्यामागील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असे म्हटले आहे.
 
एका नियतकालिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ओबामा यांनी भारत आणि अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंधांवरही भाष्य केले. भारत अमेरिकेचा सच्च मित्र असल्याचेही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले. ओबामा येत्या रविवारी तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत आहेत. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणार्‍या संचलनामध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहात आहेत. त्यामुळे यंदाचा संचलन सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी पाकिस्तानला समज दिली.
 
ते म्हणाले, दहशतवादाचा बीमोड करण्याच्या मुद्दय़ावर अमेरिका पाकिस्तानसोबत काम करीत असली, तरी तेथील दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने कदापि स्वीकारण्यासारखी नाहीत. त्याचबरोबर मुंबईवर 26/11ला ज्यांनी दहशतवादी हल्ला घडवून आणला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. दहशतवादाविरोधातील लढय़ात अमेरिका आणि भारत एकत्रितपणे लढतील.