गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 16 सप्टेंबर 2015 (11:26 IST)

मुंबापुरीला आता कोयना धरणाचा आधार

वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीमार्गे थेट समुद्रात मिसळून नाश पावणारे पाणी मुंबापुरीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोयना धरणातून थेट समुद्रात वाया जाणार्‍या ६७.५ टीएमसी पाण्याचा लाभ मुंबई आणि परिसराला नजीकच्या भविष्यात मिळणार आहे.

वीजनिर्मितीनंतर वाया जाणारे पाणी ठाणे, कल्याण, डोंबिवली, सिडको व कोकणातील वाटेवरच्या गावांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याच्या तब्बल सव्वादोन हजार कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी मंगळवारी तत्त्वत: मान्यता दिली.