गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीनगर , बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (11:27 IST)

मुख्यमंत्री घरावर पाकचा राष्ट्रध्वज!

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
 
बिजबेहरा भागात  मुफ्ती मोहम्मद सईद यांचे वडिलोपार्जित घर आहे. हिजबुल मुजाहिदिनच्या तीन दहशतवाद्यांची घरेसुद्धा याच परिसरात आहेत. 
 
प्रत्यक्षदर्र्शींच्या सांगण्यानुसार एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी निदर्शकांपैकी कुणीतरी सईद यांच्या घरावर पाकिस्तानचा ध्वज फडकविला.