गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (11:16 IST)

मुसळधारेमुळे गुजरात, राजस्थानात पुराचे थैमान

मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, मणिपूर, ओडिशा, गुजरात आणि राजस्थान या पाच राज्यांत पुराने थैमान घातले आहे.

पश्चिम बंगालमध्येही १२ जिल्हे जलमय झाले असून सुमारे ३२ लाख लोक प्रभावित झाले आहेत. तिकडे जम्मू काश्मिरात ढगफुटीमुळे लेहमधील साबू नामक गावाला चहुबाजंूना पुराचा वेढा पडल्याने गावातील शेकडो लोक अडकून पडले आहेत. यात काही विदेशी पर्यटक असल्याचेही कळते. साबू गाव लेह विमानतळापासून ७ किमी दूर मनाली-लेह महामार्गावर स्थित आहे. पाऊस आणि पूरबळींची संख्या १०० वर गेली आहे.