गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (15:25 IST)

मेट्रो स्टेशनवर जाहिरात, व्हॅलेंटाईन डे नको

नवी दिल्ली- एका धार्मिक गटाद्वारे दिल्ली मेट्रो स्टेशनांवर जाहिरातींद्वारे अपील केली आहे की त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा न करता त्या दिनी आपल्या पालकांची पूजा करावी. त्यात व्हॅलेंटाईन डे ला पोलिस कारवाईचेही समर्थन केले आहेत.
 
आसाराम बापू संघटनांद्वारे 35 स्टेशनांवर जाहिरातींमध्ये मातृ पितृ पूजन दिन दर्शवण्यात आल्यामुळे अनेक प्रवासी नाराज आहेत. दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने या प्रकरणात चौकशीचे निर्देश दिले आहे. आसाराम अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सध्या तुरुंगवास भोगत आहे.
पोस्टरमध्ये एका बाजूला दोन मुलं आपल्या आई- वडिलांची पूजा करत आहे आणि दुसर्‍या बाजूला दोन तरुण प्रेमी एकमेकांचे कान धरून उभे आहेत आणि त्यांच्याजवळ पोलिस उभी आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये.