शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: ऋषिकेश , गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (12:14 IST)

मोदींचे आध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद यांचे निधन

मागील काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद गिरि यांचे  बुधवारी रात्री येथे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. 'स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनामुळे आपले वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना' असे ट्विट करत मोदींनी त्यांच्या गुरूंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
 
स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोदींनी नुकतीच त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. 
 
स्वामी सरस्वती यांचा जन्म १९३० साली मंजाकुडी येथे झाला होता. स्वामी चिन्मयानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचे शिक्षण घेण्यास सुरवात केली.