गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Updated : शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2014 (00:02 IST)

मोदींच्या प्रचारासाठी टी-ट्वेण्टी क्रिकेट सामने

WD
रायपूर : छत्तीसगडच्या आदिवासी भागांमधील युवकांना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींकडे आकर्षित करण्यासाठी टी-ट्वेण्टी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे. भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित या टी-ट्वेण्टी मालिकेला 'मोदी कप' असे नाव देण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुराग सिंघदेव यांनी सांगितल्याप्रमाणे, बस्तर आणि सरगुजा जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी मोदी कप टी-ट्वेण्टी सामने खेळले जात आहेत. लवकरच विजेत्यांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. आदिवासी भागातील युवकांमध्ये नरेंद्र मोदींचा प्रचार करणे आणि त्यांचे विचार मांडण्यासाठी हे सामने रंगवले जात आहेत. विविध भाजपा कार्यालय परिसरांमध्ये मोदी कप आयोजित केले जात असून सर्वत्र भाजपाचे झेंडे लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर सामन्यांचे वर्णन करतानाही मोदींचा प्रचार केला जात आहे. आदिवासी भागांमध्ये मनोरंजनासाठी इंटरनेट, टीव्ही आणि दैनिकांचे प्रमाण कमी असल्याने मोदी कपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टी-ट्वेण्टी सामन्यांना वाढता प्रतिसाद पाहता मोदींच्या प्रचारासाठी इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजनसुद्धा केले जाणार असल्याचा दावा सिंघदेव यांनी केला.