गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 29 जुलै 2016 (11:07 IST)

मोदींच्या हत्त्येचा कट रचणारा दहशतवादी अबू जुंदाल दोषी

औरंगाबादमध्ये सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जुंदालसह 12 आरोपींना विशेष मोक्का   न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पण न्यायालयाने या सर्वावरील मोक्का हटवला आहे, तर 10 जणांची निर्दोष सुटका केली आहे. अबू जुंदालवर देशाविरोधात युद्ध पुकारल्याचा गुन्हा आहे. जुंदालवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. तसेच मुंबईवरील 26/11 च्या दहशतवाही हल्लाप्रकरणीही जुंदाल आरोपी आहे. त्याने अजमल कसाबला हिंदी शिकवली होती. औरंगाबादमध्ये 2006 ला सापडलेला शस्त्रसाठा हा एक कट होता.