शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

मोदींना 'खुनी पंजा' भोवला, आयोगाने बजावली नोटीस

WD
छत्तीसगडमधील निवडणूक प्रचारात 'खुनी पंजा' असा कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख केल्याने गुजरा‍तचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अडचणीत सापडले आहे. आचार संहितेचा भंग केल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने मोदींना बुधवारी नोटीस बजावली.

कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हाला 'खुनी पंजा' संबोधल्याप्रकरणी मोदी यांनी 16 नोव्हेंबरपूर्वी स्पष्टीकरण द्यावे, असे निवडणूक आयोगाने बजावले आहे. कॉंग्रेसने मोदींविरोधात तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाकडे ही कारवाई केली आहे.

कॉंग्रेसचे विभागाचे सचिव के. सी. मित्तल म्हणाले, पंजा आमचे निवडणूक चिन्ह आहे. छत्तीसगडमधील निवडणूक रॅलीत मोदींनी याचा 'खुनी पंजा' असा उल्लेख केला. या वक्तव्याने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे आणि हे कॉंग्रेसची प्रतिमा मलिन करणारे आहे. त्यामुळे आम्ही मोदी आणि भाजपविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, यापूर्वी निवडणूक आरोगाने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती.