शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (11:18 IST)

मोदींवर अद्याप निवडणुकीचा हँगओव्हर : काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अद्याप निवडणुकीचा हँगओव्हर असून ते येण्यापूर्वी हा देश केवळ भ्रष्टाचारी आणि गैरव्यवहार करणारा असल्याचे चित्र मोदी निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे.
 
विदेशी जमिनीवर ते त्यांच्या सध्याच्या विरोधकांची निंदानालस्ती करत आहेत. इतिहासामध्ये यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नव्हते, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ते येण्यापूर्वी हा देश केवळ भ्रष्टाचारी आणि गैरव्यवहार करणारा असल्याचे चित्र निर्माण करत आहेत. यामुळे त्यांच्या कार्यालयाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचेही शर्मा यांनी पुढे म्हटले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे ते भारतीयांनी केलेली कामगिरी नाकारत आहेत. आजचा भारत निर्माण करण्यामध्ये योगदान देणार्‍यांचा ते अपमान करत आहेत. ‘मोदी सरकारचा 11 महिन्यांचा कार्यकाळ झालेला आहे. आता त्यांनी दिलेली मोठमोठी आश्वासने आणि स्वप्ने लोकांना पूर्ण करून दाखवावीत’ असेही शर्मा पुढे म्हणाले. 
 
टोरँटोमध्ये बोलताना मोदी यांनी आतापर्यंत भारताला ‘स्कॅम’ म्हणून ओळखले जात होते, आता भारताला ‘स्किल्ड’ म्हणून ओळखले जाईल, असे वक्तव्य केले होते.