शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदींसमोर व्यथा मांडताना न्यायाधीशांचे डोळे पाणावले

नवी दिल्ली- याचिकांचा ढीग दूर करण्यासाठी न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करावी, असे आवाहन सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात असे आवाहन करताना ठाकूर यांचे डोळे पाणावले होते.
 
मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीशांच्या परिषदेत ठाकूर बोलत होते. ते म्हणाले, केवळ टीका करणे पुरेसे नाही. तुम्ही कामाचा ताण न्यायव्यवस्थेवर ढकलू शकत नाहीत. जर तुम्ही आपल्या न्यायाधीशांच्या कामाची तुलना इतर देशातील न्यायाधीशांची केलीत तर आपण सर्वात पुढे असल्याचे दिसेल. यापूर्वीही भाषणे करण्यात आली होती. लोक परिषदेमध्येही बोलतात. याविषयी संसदेतही चर्चा होतात. पण काही घडत असल्याचे दिसून येत नाही. 
 
1987 साली 40 हजार न्यायाधीशांची गरज होती. 1987 पासून आतापर्यंत आपली लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. जगाच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. आपण परदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करत आहोत. आपल्याला लोकांनी भारतात यावे आणि भारतात उत्पादन सुरु करावे, असे वाटते. ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोदी यांनी मुख्य न्यायाधीशांची चिंता समजली असून त्यासंदर्भात पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. सरकार आणि न्यायव्यवस्थेने एकत्र येऊन या अडचणीवर उपाय शोधेल, असा दिलासाही त्यांनी दिला.