गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 11 मार्च 2015 (11:27 IST)

यादव, भूषण यांच्याकडून पक्षविरोधी काम

‘दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात भूषण पिता-पुत्र आणि योगेंद्र यादव या त्रिकुटाने आम आदमी पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्न केले होते,’ असा आरोप ‘आप’च्या नेत्यांनी केला आहे. तसे अधिकृत निवेदनच या नेत्यांनी प्रसिद्धीस दिले असून त्यामुळे पक्षांतर्गत वादाला आणखी धार येण्याची चिन्हे आहेत.
 
योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून वगळल्यापासून ‘आप’मध्ये गोंधळाचे वातावरण आहे. यादव व भूषण यांच्यावर कोणत्या कारणासाठी कारवाई करण्यात आली, असे प्रश्न पक्षाच्या वेगवेगळ्या राज्यांतील युनिटकडून केले जात आहेत. त्यामुळे पक्षात ङ्खूट पडण्याची चिन्हे दिसू लागल्याने केजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदिया, गोपाळ राय, पंकज गुप्ता व संजय सिंह यांनी आज एक संयुक्त निवेदनच काढले. यात भूषण-यादव जोडीवरील कारवाईचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे.
 
दिल्लीच्या निवडणुकीत झाडून सगळे कार्यकर्ते पक्षाच्या विजयासाठी जीवाचे रान करत असताना प्रशांत भूषण, शांती भूषण व योगेंद्र यादव हे ‘आप’चा पराभव व्हावा म्हणून प्रयत्न करत होते.
 
प्रशांत भूषण यांनी अन्य राज्यांतील नेत्यांना दिल्लीत प्रचारासाठी न येण्याचा सल्ला दिला होता. मी प्रचार करणार नाही, तुम्हीही करू नका. केजरीवालला धडा शिकविण्याची गरज आहे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना धाडला होता. पक्षाला देणगी मिळू नये यासाठीही ते प्रयत्न करत होते. भूषण यांना केजरीवाल हे पक्षाच्या नेतेपदी नको होते. त्यामुळे ‘आप’ला 20-22 पेक्षा अधिक जागा मिळू नये, असा त्यांचा प्रयत्न होता. आशीष खेतान यांच्याकडे त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते.
 
योगेंद्र यादव हे पक्षाच्या आणि केजरीवालांच्या विरोधात राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये बातम्या पेरत होते. यादव हे अनेक पत्रकारांना स्वत:हून ‘ऑङ्ख द रेकॉर्ड’ माहिती देत होते.
 
भूषण पिता-पुत्र व यादव हे ‘आप’चे मोठे नेते आहेत. त्यांची बदनामी होऊ नये म्हणून पक्षाने अद्याप त्यांच्यावरील कारवाईचे कारण स्पष्ट केले नव्हते. मात्र, पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाहीविरोधी, बेजबाबदार असल्याची चर्चा होऊ लागल्याने आम्हाला हा खुलासा करावा लागला.