बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: मुझफ्फरनगर , शुक्रवार, 25 जुलै 2014 (16:18 IST)

युपी पुन्हा हादरले;मुझफ्फरनगरमध्ये दोन मुलींवर बलात्कार

उत्तर प्रदेशात महिलांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील केठोरा येथील दोन अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सलीम कुरेशी आणि झहिरत अशी आरोपींची नावे असून दोघे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी‍ सलीम कुरेशी व झहिरत या दोघांनी दोन्ही पीडित मुलीचे अपहरण करुन त्यांच्यायवर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, मजलीसपूर तोफिर गावामध्येही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलगी कामानिमित्त घराबाहेर पडली असताना आरोपी नीतू याने तिला जबरजस्तीने ऊसाच्या शेतात नेले आणि तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला पोलिस नीतूचा शोध घेत आहे.