शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 जून 2015 (11:03 IST)

योगा दिनासाठी पाकिस्तानचा विरोध नव्हता - सुषमा स्वराज

योगा दिवससाठी कोणात्याच देशाचा विरोध नव्हता, तसेच पाकिस्तानचाही नव्हता, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. 
 
येत्या २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जाणार आहे. भारतात या दिवशी शाळा, कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना आसनांचे धडे दिले जाणार आहेत. मुस्लिम संघटनांनी यातील काही आसनांना विशेषत: सूर्यनमस्काराला विरोध दर्शवला आहे. त्या संदर्भात पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज बोलत होत्या. 
 
सूर्य नमस्कारात एकूण १२ आसनं आहेत त्यामुळे त्याला विरोध करण्याची गरज नाही. जे योगाला विरोध करतात त्यांना योगासंदर्भात पूर्ण माहिती नाही, असेही सुषमा स्वराज यांनी ठामपणे सांगितले.  
 
मुस्लिम बांधव रोजा इफ्तार नंतर योगा करू शकतात. 7-8 ही वेळ केवळ सरकारी कार्यक्रमासाठी आहे. त्यांना ही वेळ सोडून इतर वेळीसुद्धा योगा करता येईल, असेही स्वराज यांनी सांगितले. 
 
पाकिस्तानात भारताच्या दुतावासामध्ये योगा दिवस साजरा केला जाईल, योग दिनाला 
पाकिस्तानने योगा दिनावर सहकार्य केले नाही. तरीही आम्ही भारताच्या दुतावासात आमच्या पद्धतीने योग दिन साजरा करणार आहोत, असेही सुषमा स्वराज यांनी स्प्ष्ट केले. 
 
योग दिनासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवलंय, परंतु, त्यांचे जे वक्तव्य येत आहेत, त्यावरून सोनिया, राहुल येऊ शकणार नाही असं वाटतं, असा टोलाही स्वराज यांनी लगावला. 
 
योगा दिनाला ८७ मुस्लिम देशांनी पाठिंबा दिला आहे. देशात या दिनासाठी 30 कोटी खर्च येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.