शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (11:27 IST)

रस्ते अपघातग्रस्तांना 'कॅशलेस' उपचार- नितीन गडकरी

रस्तात्यांवरील अपघात कुण्याच्या हातात नसतात परंतु या अपघातांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. अपघात रोखण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.  यासाठी कायद्यात बदल करून अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार केले जाणार असल्याचीही माहिती गडकरी यांनी दिली. 
 
मोदी सरकारमधील शंभर दिवसांच्या कामगिरीचा आढावा  गडकरींनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडला. आपल्या राजकीय जीवनात कोणत्याही पत्रकाराला तुम्ही अमुक घोषणा केली होती, परंतु ती पूर्ण झाली नाही, असा प्रश्न विचारण्याचे धाडस झाले नाही. देशात दरवर्षी साडेपाच लाख रस्ते अपघात होतात. यात दीड लाख जणांचा जीव गमवावा लागतो. यामुळे अशा दुर्घटना रोखण्यासाठी जल वाहतुकीचा चालना देण्यात येणार असल्याचेही गडकरींनी सांगितले.