बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2015 (12:42 IST)

'राखी बिड़लान'च्या घरी एका स्त्रीला बेल्टने मारहाण!

नवी दिल्ली। आम आदमी पक्षाची माजी महिला मंत्री व बाल विकास मंत्री राखी बिड़लानच्या घरी एका स्त्रीला मारहाण केल्याची बातमी आहे. राखी बिड़लानचा भाऊ आणि एएपीचा युवा नेता विक्रमवर त्याच्या

बायकोने बेल्टने मारहाण केल्याचा आरोप लावला. तिच्या अंगावर जागोजागी मारहाण केल्याचे निशाणंदेखील आहेत. रोहिणी दक्षिण पोलीस स्टेशन येथील पोलिसाने त्यांचे मेडिकल केले आहे. या प्रकरणाची तपासणी केली जात आहे.

प्रियंकाचा आरोप आहे की तिच्याबरोबर वर्षांपासून मारहाण होत आहे आणि जेव्हापासून राखी बिड़लान आमदार म्हणून नियुक्त झाली तेव्हापासून विक्रम आणखी बिंदास्त झाला आहे. प्रियंकाने तिच्या नवर्‍याचे इतर मुलींबरोबर अनैतिक संबंध असून तिच्याकडे विक्रमच्या अनैतिक संबंधाचे स्टिंग असल्याचे ही सांगितले. राखी बिड़लानची भावजय प्रियंका ने सांगितले की अता ती अजून अत्याचाराला बळी जाणार नाही आणि त्यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करेल. ती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडेही तक्रार करून त्यांना पूर्ण प्रकरणाची जाणीव करून देणार आहे.