गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

राजकुमारने नष्ट केला आरुषीचा मोबाईल

आरुषी आणि हेमराज या नोएडातील दुहेरी खून खटल्या प्रकरणात महत्त्वाचा पुरा ठरू शकणाऱ्या या दोघांचे मोबाईल फोन आपण नष्ट केल्याची कबुली डॉ दुर्रानी यांच्या नोकर राजकुमारने दिली आहे.

शनिवारी राजकुमार याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सीबीआयने न्यायालयात ही माहिती दिली. भारतीय दंडसंहिता कलम 161 अनुसार राजकुमार याने आपणच हे पुरावे नष्ट केल्याचे कबूल केल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

15 मे रोजी आरुषी आणि हेमराज यांची नोएडात हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी आरुषीचे वडील डॉ राजेश तलवार यांना या प्रकरणी अटक केली आहे.