शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 3 जुलै 2015 (10:52 IST)

राजनला उडवणचा दाऊदचा कट पुन्हा फसला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा कट्टर शत्रू असलेल्या छोटा राजनला कायमचा संपवण्याचा ‘डी’ गँगचा ‘फुलप्रूफ प्लॅन’ पुन्हा एकदा फसला आहे. राजनला संपवण्याची डॉनची ‘तमन्ना’ पूर्ण करण्यासाठी त्याचा खास ‘पंटर’ छोटा शकीलने हा प्लॅन आखला होता. राजनचा ठावठिकाणा मिळवून त्याचा गेम करण्यासाठी शूटरही पाठवले. पण, अखेरच्या क्षणी टीप मिळाल्याने राजन अंडरग्राउंड झाला आणि हा प्लॅन फसला.
 
गेल्या एप्रिल महिन्यात कराचीतून भारतात एका विशिष्ट क्रमांकावर अनेकदा फोनाफोनी झाली. नेपाळमध्ये नोंद असलेल्या 00971504 या डब्लूएलएल नंबरवरून हे कॉल गेले होते. छोटा शकील राजनच्या एका विश्वासू माणसाला गळाला लावण्याचा प्रयत्न करतानाचे हे संभाषण आहे. शकीलच्या सतत मागावर असलेल्या गुप्तचर यंत्रणांनी हिंदी व ऊर्दूतील हे संभाषण टॅप केले आहे. या संभाषणावरून शकीलचा हात छोटा राजनच्या गळ्यापर्यंत जवळपास पोहोचल्याचे समोर आले आहे.
 
वाढत्या वयामुळे गेल्या काही वर्षात छोटा राजन टोळीच्या गुन्हेगारी कारवाया मंदावल्या आहेत. त्याच्यापासून दाऊदच्या साम्राज्याला आता तितकासा धोका उरलेला नाही.