शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बारमेर , रविवार, 11 सप्टेंबर 2016 (10:10 IST)

राजस्थानात मिग कोसळले

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात शनिवारी सकाळी भारतीय हवाई दलातील मिग-21 प्रकारातील एक लढाऊ विमान कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेतून वैमानिक बचावला आहे.
 
सुत्रांच्‍या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे विमानाचे उड्‍डाण झाले होते. विमान कोसळल्‍याची माहिती मिळताच वायुसेनेचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली आहे. जखमी वैमानिकाला रुग्‍णालयात नेण्‍यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.