गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , गुरूवार, 30 जुलै 2015 (11:28 IST)

रामेश्वरममध्ये कलाम यांना अखेरचा निरोप ...

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना शेवटचा निरोप देण्यासाठी रामेश्वरममध्ये लोकांची गर्दी जमली आहे. त्यांची अंतिम यात्रा सुरू झाली आहे. थोड्याच वेळात राजकीय सन्मानासोबत त्यांचा अंतिम संस्कार करण्यात येईल.  

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी डॉ. कलाम यांच्या अंत्यविधीस उपस्थित.

 रामेश्वरम: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. कलाम यांना केला अखेरचा सलाम.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे पोहोचले.

डॉ. कलाम यांच्या अंत्यविधीसाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, व्यंकय्या नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूही उपस्थित.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे उपस्थित राहून डॉ. कलाम यांना अखेरचा निरोप देणार.

डॉ. कलाम यांची अंत्ययात्रा सुरू, लाडक्या राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी रामेश्वरममध्ये लोकांची मोठी गर्दी.

 डॉ. कलाम यांच्या अंत्ययात्रेला थोड्याच वेळात होणार सुरूवात, शासकीय इतमामात दिला जाणार अखेरचा निरोप.