बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बंगळुरु , बुधवार, 24 ऑगस्ट 2016 (11:26 IST)

राम्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा?

'पाकिस्तान नरक नाही, तेथील लोकही आपल्यासारखेच आहेत. ते अत्यंत चांगली वागणूक देतात', असं वक्तव्य कन्नड अभिनेत्री राम्या यांनी केलं आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या वक्तव्याला उत्तर देत पाकिस्तान नरक नसल्याचं राम्या बोलल्या होत्या. काँग्रेस पक्षाच्या सदस्य असलेल्या राम्या सार्कतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या . राम्या यांचं वक्तव्य देशद्रोही असल्याचा आरोप करत वकील असणा-या के विठ्ठल गौडा यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. राम्या यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेध करत माफी मागण्याची मागणी केली आहे. मात्र राम्या यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगितलं आहे. राम्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.