शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: कोलकाता , शनिवार, 28 मे 2016 (12:10 IST)

राष्ट्रगीता सुरू असताना फारूख अब्दुल्ला फोनवर!

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आहे.

शपथविधीसोहळ्यादरम्यान राष्ट्रगीता सुरू असताना अब्दुल्ला मात्र फोनवर होते, असा आरोप करण्यात येत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. राज्याचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी रेड रोडवर आयोजित एका समारंभात ६१ वर्षीय ममता बॅनर्जी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यात राष्ट्रगीत सुरु असताना, फारुख अब्दुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, ते फोनवर बोलत असल्याचे कॅमे-यांमध्यै कैद झाले आहे. या मुद्यावरून अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका होत असून त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे बोलले जात आहे.