गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (11:17 IST)

राहुल गांधी खरोखरच ज्ञान नसलेले तज्ज्ञ- भाजप

नवी दिल्ली- कांग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जम्मू- काश्मीर भेट ही त्यांचा देशाविषयीची दृष्टिकोन दाखवत असून गांधी हे खरोखरच ज्ञान नसलेले तज्ज्ञ असल्याची टीका भाजपने केली आहे.
 
भाजप प्रवक्ते संबित पात्रा गांधी यांच्या जम्मू- काश्मीरच्या दौर्‍याबाबत बोलत होते. देश गांधी यांना गांभीर्याने घेत नसल्याचे यावेळी पात्रा म्हणाले. जम्मू- काश्मीरच्या भेटीबाबत बोलायचे झाले तर राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष सीमारेषेवर जाऊन पाकिस्तानी सरकारला शस्त्रसंधीच्या भांगांबद्दल तसेच दहशतवादी कृत्याला करत असलेल्या समर्थनाबाबत जाब विचारायला हवा अशा शब्दांत पात्रा यांनी गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पुढे म्हणाले, पण पाकिस्तानशी चर्चा करण्यापेक्षा राहुल गांधी सीमेवर जाऊन भारत सरकारवर तसेच भारताच्या पंतप्रधानांवर प्रश्न उपस्थित करतात. हा राहुल गांधी यांच्या भारतबाबतच्या आणि राजकारणाबाबतचा दृष्टिकोन आहे. यातून कांग्रेस कोणता संदेश देत आहे, हे सारे जग पाहत आहे.