बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 3 मार्च 2015 (23:14 IST)

राहुल गांधी थायलंडमध्ये

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी विपश्यनेचे धडे घेण्यासाठी थायलंडला गेले असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते विपश्यनेसाठी थायलंडला जात असल्याचे सूत्राने सांगितले. राहुल गांधी सध्या थायलंडच्या जंगलातील एका बौद्ध स्तुपात विपश्यनेचे धडे घेत आहेत. एक महिन्याच्या प्रशिक्षासाठी ते थायलंडला गेले आहेत. 15 मार्चला ते भारतात परतणार आहे. त्यानंतर सामाजिक विषयांवर पदयात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी संपूर्ण देश ढवळून काढणार असल्याचे समजते. दरम्यान प्रियंकानीच राहुल यांना विपश्यनेचा सल्ला दिल्याची खात्रिदायक माहिती सूत्रांनी दिली आहे.